
देवगड : देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत शासकीय भात खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अजित पांडुरंग गोगटे यांनी केले आहे.
भात कापणी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भाताची, खरेदी विक्री संघामार्फत शासन आधारित किमतीवर खरेदी करण्यात येते. यावर्षी एकूण 3 केंद्रांवर भात खरेदी करण्यात येणार आहे, त्यामध्ये देवगड पडेल आणि पाटगाव येथे भात खरेदी करण्यात येणार आहे. अधिक महितीसाठी संघाचे व्यवस्थापक कौस्तुभ जामसंडेकर 9421146107 यांच्याशी संपर्क साधावा.