देवगड पोलिसांनी मटका, दारूधंदे एका रात्रीत केले उधवस्त !

मुद्देमालासह चौघे ताब्यात
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 08, 2022 14:42 PM
views 355  views

देवगड : देवगडमधील मटका दारू धंदे बंद करा, अन्यथा 15 नोव्हेंबरला मोर्चा काढू, या अल्टिमेटमनंतर देवगड पोलीस स्टेशन ॲक्शन मोडमध्ये असून देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी रात्री थेट मटका बुकिंगवर धाड टाकली आहे. 

निपाणी रोडवरील रामेश्वर मेडिकलसमोरील गल्लीमध्ये एका खोलीमध्ये पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे पोलीस हवालदार राजन जाधव, अमित हळदणकर, प्रशांत जाधव यांनी छापा मारला असता तेथे मटका जुगारावरील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य एकूण सुमारे 6600/- असे गोळा करून मुंबई मटका हा जुगार खेळत असताना सुबोध दत्तात्रेय कांबळी (राहणार देवगड ) प्रवीण जयवंत मणचेकर (राहणार शिवनगर) वीरेंद्र वासुदेव जाधव (राहणार देवगड), गुरुनाथ तुकाराम सारंग, (राहणार मुणगेकरनगरी देवगड) हे मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.


अन्य सहा ठिकाणी दारू व मटका धंद्यावर छापे टाकले असून देवगड जामसंडे शहरातील सर्वच मटका धंदे उध्वस्त करून टाकले आहेत, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल देवगड पोलीस स्टेशनला भेट देत असून आमदार नितेश राणे ही आपल्या विविध कामानिमित्त देवगड मध्येच आहेत.  या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.