देवगड पंचायत समितीचा प्रचार प्रसिद्धी कक्ष ठरला लक्षवेधी..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 12, 2024 14:19 PM
views 170  views

देवगड : देवगड कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पंचायत समिती देवगड व जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या कक्षात अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या . या कक्षात शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर, सामाजिक कार्यकर्ते किरण सामंत यांनी भेट देत मार्गदर्शन केले . हा कक्ष पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव तसेच ग्रामपंचायत कुणकेश्वर  सरपंच महेश ताम्हणकर , ग्रामसेवक गुणवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय योजनांची जनजागृती करण्यात आली.

या कक्षात अनेक मान्यवर, पदाधिकारी , लोकप्रतिनिधी  , व ग्रामस्थांनी कक्षास भेट देऊन कक्षास शुभेच्छा दिल्या . या कक्षात येणाऱ्या मान्यवांचे स्वागत करण्यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी  निलेश जगताप ,कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) अंकुश जंगले, अधिक्षक कुणाल मांजरेकर , अधिक्षक मेधा राणे ,लेखाधिकारी रमेश उपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती . या कक्षाद्वारे माहिती शिक्षण व संवादचे नविन तंज्ञ व मंत्र लोकांपर्यत नव्याने पोहोचावी , ओडीएफ प्लस झालेल्या गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य रहावे . यासाठी मार्गदर्शन , आदर्श गावाची यशोगाथा याबाबत चित्रफितद्वारे माहिती देण्यात आली .

तसेच महाशिवरात्रीला येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमेश पाटील व आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सुविधा देण्यासाठी १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह , आरोग्य सहाय्यक ७ , आरोग्य सहाय्यिका ८ , आरोग्य सेवक १२, आरोग्य सेविका ३१ , आरोग्य पर्यवेक्षक २ , वाहन चालक ६ ,परीचर १२ असे  एकुण ८३आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले होते . यात्रेत आरोग्याच्या चार पथके व जिल्हा नियंत्रण पथक तैनात होते . अतिदक्षतेकरिता १०८ च्या तीन व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या तीन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.