देवगड जामसंडे पाणी प्रश्न मार्गी लावणार

नळपाणी योजना दुरुस्तीला प्राधान्य : नगराध्यक्षा साक्षी प्रभू
Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 01, 2023 16:03 PM
views 79  views

देवगड : देवगड - जामसंडे नगरपंचायत हद्दीतील पिण्याच्या पाण्याची समस्या, पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याकरता आपले प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने नामदार उदय सामंत नामदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी चार कोटी रुपयांच्या निधी प्राप्त झाला.

नगरपंचायत हद्दीतील १७ प्रभागातही या पुढील काळात पर्यटन दृष्ट्या आवश्यक असणारा तसेच आवश्यक त्या विकास कामांकरिता पुरेसा निधी मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी दिली आहे . देवगड जामसंडे नगरपंचायतीचे सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष मिताली सावंत, आरोग्य शिक्षण सभापती विशाल मांजरेकर,पाणीपुरवठा सभापती संतोष तारी,बांधकाम समिती सभापती तेजस मामघाडी, मुख्याधिकारी सुरज कांबळे, व्यासपिठावर उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विकास कामांकरिता चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदन ठराव नगरसेवक रोहन खेडेकर यांनी मांडला.त्यानंतर मागील सभेचे इतिवृत वाचन स्थायी समिती इतिवृत्त वाचन करण्यात आले या चर्चेत लेखापरीक्षण अहवालात मक्तेदाराकडून वसूल करण्यात येणारी दंडाची लाखो रुपयांची रक्कम अद्यापही वसूल केली गेली नसल्याने नगरसेवक नितीन बांदेकर यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच देवगड जामसं डे नगरपंचायतीसाठी कार्यन्वित असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन पंप व मोटर खरेदी करण्याबाबत विचार विनिमय करून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे ठरले. देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील पवनचक्की येथील नगरपंचायत मालकीच्या खुल्या क्षेत्रात व्यवसाय करण्यास परवानगी मिळणे बाबत अर्ज बाबत विचार विनिमय करण्यात येऊन,याकरिता आवश्यक असणारी व जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी व त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे ठरविण्यात आले. नगरपंचायत मालकीच्या खुल्या क्षेत्रात काही भागात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास येत असून त्यावर आवश्यक ती कारवाई ची नोटीस बजावण्यात येऊन अंतिम नोटीस बजावण्यात यावी, व त्याकरता आवश्यक असणाऱ्या बांधकाम हटविण्याचा होणाऱ्या खर्चाबाबत योग्य तो निर्णय घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. विना परवानगी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक व परप्रांतीय व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्याबाबत देखील या सभेत चर्चा झाली.

त्याच बरोबरच देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सात पायरी इंग्लिश मीडियम स्कूल नगरपंचायत मालकीच्या विंधन विहिरीवर पाण्याचे टाकीचा चबुतरा बांधकाम करणे व पाईप लाईन बदलणे बाबत चर्चा हि करण्यात आली,विकास कामांच्या बाबतीत जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपायोजना२०२३-२४ करिता अंदाजपत्रकासह कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हा वार्षिक आराखडा २०२३-२४ मध्ये काम समाविष्ट करण्याबाबत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांचे कडील पत्राबाबत विचार विनिमय करून त्यातील त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे ठरले देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्याकडे नगरसेवक यांच्या विकास कामाबद्दल प्राप्त अर्जाबाबत चर्चा करण्यात येऊन या अर्जांचे वाचन करण्यात आले. व त्या विकास कामाबाबत योग्य ती कार्यवाही या पुढील काळात करण्याचे ठरले. प्रभाग क्रमांक ५ मधील प्रबुद्ध नगर येथे नवीन ट्रांसफार्मर बसविणे बाबत आवश्यक ती कार्यवाही नगरपंचायत प्रशासनामार्फत करण्यात यावी असे ठरविण्यात आले .अतोद्योय योजनेत समाविष्ट असणाऱ्या प्राप्त लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरता देवगड जामसंडे नगरपंचायतीकडून आवश्यक तो ना हरकत दाखला देत असताना आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून व योग्य ती खात्री करून देण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले .