
देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. ८ मधील भवानी कॉम्प्लेक्स पर्यंत जाणारा अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या रस्त्याचे भूमिपूजन देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजवळ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
वैशिष्ट्य पूर्ण योजना २०२३ -२४ अंतर्गत नाम. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. यावेळी म ाजी आम. अजित गोगटे जिल्हा उपाध्यक्षा सौ. प्रियांका साळस्कर, मंडल अध्यक्षा सौ. उषः कला केळुस्कर शहर अध्यक्षा सौ. तन्वी शिंदे नगरसेवक संतोष तारी, व्ही. सीः खडपकर, उल्हास मणचेकर, भवानी कॉम्प्लेक्स सोसायटीचे सेक्रेटरी दिपक नलावडे, प्रकाश मसुरकर, विजय सावंत, राजेंद्र राणे, निनाद नलावडे, अपर्णा नलावडे, पार्वती कोयंडे, सौरभ कोयंडे इ. उपस्थित होते.