देवगड मराठा समाजाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 19, 2024 14:53 PM
views 209  views

देवगड : देवगड तालुका सकल मराठा समाज्याच्या वतीने नुकताच   प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा देवगड येथील हॉटेल वेदा या ठिकाणी पार पडला. 

आपल्या समाजात काम करत असताना समाज हितासाठी एकत्र येऊन आदर्श नागरिक म्हणून समाज हितासाठी काम करणे हे महत्त्वाचे असून दिनदर्शिकाच्या माध्यमातून आपला समाज समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत घराघरात पोहोचणार आहे. या माध्यमातूनच आपल्या समाजाच्या कार्याची ओळख खऱ्या अर्थाने प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचणार आहे. याकरिता सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन कार्य करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन मराठा समाज देवगडचे तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी देवगड येथे बोलताना व्यक्त केले. 

या निमित्ताने ज्येष्ठ समाज बांधव सदानंद पवार, निशिकांत साटम, शिवराम निकम, अविनाश सावंत यांनी ही यावेळी उपस्थितांना संबोधित करून सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन एक आदर्श नागरिक म्हणून समाजासाठी काम करावे असा संदेश मराठा समाज बांधवांना दिला. मराठा समाज देवगडच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जेष्ठ समाज बांधव सदानंद पवार,निशिकांत साटम, अविनाश सावंत, संध्या राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मराठा समाज दिनदर्शिका फलकाचे फीत कापून अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे दिनदर्शिका प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

या सोहळ्यास मराठा समाज देवगड तालुका अध्यक्ष संदीप साटम, सचिव केदार सावंत, संजीव राऊत, शेखर सावंत गोळवणकर, काका राऊत, बंटी कदम, किसन सूर्यवंशी, प्रवीण सावंत, सूर्यकांत पाळेकर, योगेश राणे, प्रदीप सावंत, पंकज दुखंडे, शिवराम निकम, शरद लाड, अजित राणे, महेश पाटोळे, प्रणव नलावडे, महिला सदस्य संगीता भुजबळ, हर्षदा सावंत, शरयू ठुकरुल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश राणे यांनी केले.