
देवगड : देवगड येथील हिंदळे ग्रामपंचायत कार्यालय येथील रक्तदान शिबिरात एकूण ५८ रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. शनिवार ३ ऑगस्टला हिंदळे ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थ, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड व मानवाधिकार राजदूत संघटना सिंधुदुर्ग तालुका शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरास अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला.
३ महिला रक्तदात्यांसह एकूण ५८ रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होत ..पावणाई गावाचे सरपंच पप्पू लाड यांनी रक्तदान करत शिबिरास शुभेच्छा दिल्या. गायत्री गोसावी रा देवगड यांच्यासाठी A निगेटिव्ह संतोष भुजे जामसंडे यांनी रक्तदान केले. सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते रिझर्व्ह करून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे उध्दव गोरे, विजयकुमार जोशी रवी चांदोस्कर, प्रकाश जाधव, भावेश पटेल, अनुप बापट यांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. माजी सभापती सुनील पारकर, महेश खाड्ये (तळेबाजार) यांच्या मार्फत सर्व रक्तदात्यांना छत्रीच्या स्वरूपात भेटवस्तू दिली गेली. हिंदळे सरपंच मकरंद शिंदे, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स जिल्हा उपाध्यक्ष दयानंद तेली, तालुका अध्यक्ष श्याम कदम, जिल्हा महिला सरचिटणीस दीक्षा तेली यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय हिंदळे ग्रामस्थ, स्थानिक लोकांसोबत नेपाळी , कन्नड बंधू ही रक्तदान करतांना दिसून आले.
सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड महेश शिरोडकर, हिंदळे भंडारवाडा शाळा शिक्षक यांनी रक्तदान विषयी भावी रक्त दाते म्हणून माहिती देण्यासाठी मुलांसमवेत भेट दिली. तसेच सभापती सुनिल पारकर, हिंदळे ग्रा.पं.सरपंच मकरंद शिंदे, मनोज जाधव आदी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते.