देवगडमध्ये उद्या उबाठा सेनेचे आंदोलन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 18, 2026 21:06 PM
views 65  views

देवगड : देवगड उबाठा शिवसेनेचे इंधन दरवाढीविरोधात उद्या १९मे रोजी आंदोलन होणार असून तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा निघणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना तसेच शाखाप्रमुखांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाप्रमुख रविंद्र जोगल आणि जयेश नर यांनी केले आहे.

देशभरातील वाढत्या इंधन दरांच्या निषेधार्थ देवगड तालुका उबाठा शिवसेनेच्या वतीने १९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रामेश्वर मेडिकल येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.