मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप

Edited by:
Published on: June 24, 2025 11:36 AM
views 66  views

देवगड : मत्स्योद्योग व बंदर विकास तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग ना. नितेश नारायण राणे  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  तळेबाजार पंचक्रोशीमधील भाजपचे सक्रीय कार्यकर्ते रोहीत म्हापसेकर, देवगड नगरपंचायत माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, मंगेश रजपूत यांनी तळेबाजार येथील अंगणवाडी, प्राथमिक शाळा,आणि महात्मा गांधी विद्यामंदिर येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वह्या व पेन असे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

तसेच शिक्षकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.यावेळी सिद्‌धीविनायक सभागृहाच्या व्यासपीठावर न.पं. शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष संदीपशेठ तेली, उपाध्यक्ष  राजेंद्रशेठ म्हापसेकर, खजिनदार  संतोष वरेरकर, अॅड. माणगावकर, तळवडे माजी सरपंच पंकज दुखंडे, पूजा दुखंडे, विदयमान सरपंच गोपाळ रूमडे, दया मोंडकर, प्रिया म्हापसेकर,सुधीर म्हापसेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक  राजेश वाळके, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपास्थित भाजप कार्यकर्ते यांच्याकडून प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके यांचा शाल व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटरी सर्वांना लाडू वाटप करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तप्रसाद जोईल यांनी केले.