नितेश राणे हिंदुत्ववादी कडवा नेता, हवामान बदलण्याची ताकद

देवेंद्र फडणवीसांनी केलं भरभरून कौतुक
Edited by:
Published on: November 17, 2024 18:04 PM
views 283  views

कणकवली :  कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार,माझे मित्र नितेश राणे यांनी मला जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते. मात्र हवामान खात्याने अनुकूलता न दर्शवल्यामुळे ऐनवेळी मला सभा रद्द करावी लागली. तसेही जेथे जेथे नितेश राणे हे नाव येते, तिथे तिथे हवामान बदलण्याची ताकद या नेत्यांमध्ये आहे.  आणि स्वतः नारायण राणे साहेब तिथे असल्याने माझ्या प्रचाराची तशी गरज पण नाही.नितेश राणे यांनी आमदार म्हणून केलेले जे काम आहे, ते कामच त्यांना निवडून आणण्याकरता पुरेसे आहे.कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. मी त्यांना म्हटलं की तुम्ही निवडून तर येणारच आहात. तरीपण त्यांनी प्रेमापोटी मला सभेला येण्याचा आग्रह केल्याने मी नाही म्हणू शकलो नव्हतो. तरी माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी आहेत.असे सांगितले. दरम्यान आ.नितेश राणे हिंदुत्ववादी कडवा नेता असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ द्वारे काढले आहेत.

आ.नितेश राणे हे नव्या रक्ताचे हिंदुत्ववादी आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे येत आहे. विधानसभेतील त्यांची भाषण अभ्यासपूर्वक आहेत. संपूर्ण राज्यात हिंदू जागरणाचे त्यांनी केलेलं कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांना विजयासाठी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. कणकवली मतदारसंघातील सर्व मतदारांना माझे विनम्र आवाहन आहे की, मोठ्या मताधिक्याने नितेश राणे यांना निवडून द्या. संघटित शक्तीसाठी त्यांनी विधानसभेत असलेच पाहिजे. त्यांना आमदारकीच्या हॅट्रिकसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.