
वेंगुर्ला : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील कोचरे गावासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी येथील क वर्ग ग्रामीण पर्यटन स्थळ श्री गुरुदेव दत्त मंदिरच्या ६० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ आज श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
जिल्हा वार्षिक योजना क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र अंतर्गत कोचरा श्री दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी सुमारे १० लाख रुपये, जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत पर्यटन स्थळांच्या मूलभूत सुविधांकरिता अनुदान योजने अंतर्गत कोचरा दत्तमंदिर जेटी परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी सुमारे ३५ लाख रुपये तर जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत लहान बंदरांचा विकास करणे यात कोचरा खाडी किनारी दत्तमंदिर जेटी जवळ पर्यटक निवारा शेड बांधणे यासाठी सुमारे १५ लाख रुपये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्फत मंजूर करण्यात आले आहेत. या विकासकामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी सावंतवाडी माजी उप नगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, कोचरा सरपंच योगेश तेली, निवती सरपंच अवधूत रेगे, सुरज परब, मातोंड ग्रा. प. सदस्य दिपेश परब, कोचरा उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, ग्रा.प सदस्य अनिल मेस्त्री, विशाल वेंगुर्लेकर, संजय गोसावी, स्वरा हळदणकर, प्रगती राऊळ, दत्तमंदिर देवस्थान कमिटी अध्यक्ष राजेश रेगे, माजी सरपंच सुनील करलकर, माजी उपसरपंच देवदत्त साळगावकर, आबा कोचरेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सरपंच योगेश तेली यांनी शाल, शिफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. तर कोचरे गावासाठी कोट्यवधींचा निधी दिल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानत आगामी काळात कोचरावासीयांनी मंत्री केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आवाहन केले.