कसई-दोडामार्गात विकासकामांचा झंझावात | एकाच वेळी उद्या होणार 7 कामांचा शुभारंभ

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली माहिती
Edited by: संदीप देसाई
Published on: December 29, 2022 16:57 PM
views 171  views

दोडामार्ग : नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वाखाली कसई- दोडामार्ग नगरपंचायत कार्यक्षेत्रात मंजूर झालेल्या विविध विकासाकामांचा भुमिपुजन व लोकार्पण सोहळा ३० डिसेंबरला सकाळी ११.०० वाजता संपन्न होणार आहे.

नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांच्या टीमने घेतलेली मेहनत व केलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील 

१) मराठे प्लॉटींग रस्ता खडीकरण करणे व रस्त्याच्या एका बाजूने कॉक्रीट गटार बांधकाम करणे, २) शिक्षक कॉलनी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे व एका बाजूने कॉक्रीट गटार बांधकाम करणे. ३) कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीमध्ये नवीन मच्छीमार्केट इमारतीचे बांधकाम करणे. ४) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागी स्वच्छतागृह व विश्रामगृह बांधणे. ५) दोडामार्ग गांधी चौक सुशोभिकरण करणे, ६) कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत मैला प्रक्रिया केंद्र (FSTP) चे बांधकाम करणे.  ७) मैला प्रक्रिया केंद्र (FSTP) कडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरण करणे. ८) कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील पंचशीलनगर येथील हैडपंप विंधन विहीरीची - दुरूस्ती व सुशोभिकरण करणे आदी कोट्यावधीच्या कामांचा शुभारंभ नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर,  शिक्षण व आरोग्य समिती सभापती सौ. गौरी पार्सेकर, महिला व बालकल्याण समिती सौ. ज्योती जाधव, महिला व बालकल्याण उपसभापती क्रांती जाधव यांसह 

मुख्याधिकारी, नगरपंचायत सर्व नगरसेवक, नगरसेविका व सर्व कर्मचारीवृंद यांच्या उपस्थितीत होणार आहेत. नागरिकांनी या वेळी या विकास पर्वच्या शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हांस अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा द्यावी असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांच्या टीमने केलं आहे.