मल्टीस्पेशालिटीसह विकासकामं मार्गी लागतील !

युवराज लखमराजे, संजू परब यांचा दावा
Edited by:
Published on: November 23, 2024 17:58 PM
views 292  views

सावंतवाडी : दीपक केसरकर यांचा विजय निश्चित होता.‌आगामी काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे या भागात होतील असा विश्वास शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी व्यक्त केला. तसेच युवाशक्ती केसरकर यांच्या मागे खंबीरपणे होती व पुढेही राहील असा विश्वास युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केला. 

संजू परब म्हणाले, दीपक केसरकराचा विजय पक्का होता. साईंची आरती करणारा एकीकडे अन् लोकांना त्रास देणारे दोघे दुसरीकडे होते. यात जनतेनं आम्हाला साथ दिली. येणाऱ्या काळात देखील मोठ्या प्रमाणात निधी आणला जाईल असा दावा संजू परब यांनी केला. तर युवा पिढीची ताकद दीपक केसरकर यांच्यामागे होती‌. पुढील काळातही आम्ही सोबत राहू. मल्टीस्पेशालिटीचा विषय मार्गी लागला आहे. राजेसाहेबांची सही झाली असून कुटुंबातील एक सही झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती युवराज लखमराजे भोंसले यांनी दिली.