गेळे गावसाठी पालकमंत्र्याकडून विकासाची भेट !

Edited by: विनायक गावस
Published on: July 22, 2023 15:33 PM
views 348  views

सावंतवाडी : साधारण ५ ते ६ महिन्या पूर्वीची गेळे भाजपा बूथ बैठक भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते अंकुश गवस यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. 

गावाचा सर्वांगीण विकासाचा आराखडा आणि त्याची अंमलबजावणी याची चर्चा करण्यात आली त्यावेळी हिरण्यकेशी नदीवरील खोळेखोळ पुल नव्याने करण्याची गरज आहे अशी मागणी समोर आली. या छोट्या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहते आणि गावाचा संपर्क तुटतो, वाहतुकीची अडचण निर्माण होते अशा भावना व्यक्त झाल्या. त्यानंतरच हा पूल मोठा व नव्याने करायचा ध्यास माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी घेतला. आज पावसाळी अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बजेट च्या माध्यमातून या ठिकाणी नवीन पुलासाठी रू.२ कोटी (रुपये दोन कोटी) चा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा 

 रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. गेळे गावचे युवा सरपंच सागर ढोकरे, उपसरपंच श्री.विजय गवस, बूथ अध्यक्ष श्री.राजू गावडे, श्री.अंकुश गवस, श्री.आनंद बंड, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व गेळे ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे.