देवसू जि. प. शाळेवर फांदी पडून नुकसान...!

Edited by: विनायक गावस
Published on: July 06, 2023 21:22 PM
views 84  views

सावंतवाडी : तालुक्यात बुधवारी रात्री कोसळलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे किरकोळ पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले यात देवसू येथील जिल्हा परिषद शाळेच्या पत्र्याच्या शेडवर वडाच्या झाडाची फांदी पडून नुकसान झाले. तर सातार्डा येथे साकवावर झाड पडून काहीसे नुकसान झाले. दरम्यान गेल्या २४ तासात तालुक्यात कोसळलेल्या पावसाची नोंद ११८.१ मिमी झाली आहे.

सावंतवाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी दिवसभर कोसळलेल्या पावसानंतर रात्री काहीशा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. तर संततधार पावसाने नद्या नाल्यांनाही परिस्थितीत उद्भवली होती. एकूणच बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात देवसू जिल्हापरिषद शाळेसमोरील पत्र्याच्या शेडवर वडाची फांदी मोडून तब्बल पस्तीस हजाराचे नुकसान झाले.सदरची फांदी बाजूल करत तलाठ्याकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. तर सातार्डा येथेही साकवावर झाड पडल्याने काहीसे नुकसान झाले. याबाबत येथील महसुल कार्यालयात नोंद करण्यात आली आहे.