
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव पाडागर येथील नैसर्गिक सैतावडे न्हावणकुंड धबधब्याचे तसेच तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले असून सैतावडे न्हावणकुंड धबधबा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच माजी सभापती सदानंद उर्फ नंदू देसाई यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
मुंबई - गोवा महामार्ग नांदगाव पासून अवघ्या १५ की. मी. व शिरगाव पासून ३ कि. मी. अंतरावर असणारा देवगड तालुक्यातील शिरगाव पाडागर येथील हा निसर्गरम्य सैतावडे न्हावणकुंड नैसर्गिक धबधबा बारमाही वाहणारा असून या धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठीमोठ्या प्रमाणावरती पर्यटक येत असतात. यावेळी धबधब्याला सिंधुरत्न योजनेतून नवा लुक देण्यात आला असून सैतावडेन्हावणकुंड धबधबा हा निसर्गरम्य स्वरचित असल्याने अनेक पर्यटकांना आकर्षित करत आहे.
यामुळेच सध्या सिंधुरत्न योजनेतून ३० लाख रूपये खर्च करून धबधब्याला नवालुक देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.सध्या सेल्फी पाँईट,स्वागत कमानी, चेंजिंग रूम, बाथरूम, टॉयलेट, परीसरात पेवर ब्लॉक, धबधब्यावर जाणा-या पाय-या व रॅम्प, बैठक व्यवस्था व रंगरंगोटी तसेच लेडीज व जेट्स साठी वेगवेगळ्या दोन स्विमिंग पुलांचे बांधकाम अशी कामे पूर्ण झाली असून इतर कामे येत्या काळात पूर्ण होणार आहेत या धबधब्याची निर्मिती झाल्यानंतर लोखंडी रॅम्प, पाय-या, बाधरूम, टॉयलेट, रस्ता अशा प्रकारे पयाभुत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.यावेळी सिंधुरत्न योजनेतून धबधब्याचे कायापालट केला गेला असून धबधब्याचा नवालूक पर्यटकांना मोहित करणारा ठरणार आहे.आता मात्र मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटकांकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.त्याचबरोबर पर्यटकांना नाष्टा व जेवनाची सोय व्हावी यासाठी स्थानिकांनी दुकाने मांडून पर्यटकांची सोय व्हावी अशी देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होईल.
सैतावडे न्हावणकुंड धबधबा
शुभ्र पांढऱ्या धारांची ‘सुनी सुनी मैफिल’यंदाच्या जून जुलै महिन्यातील वर्षां पर्यटनाच्या वेळी पर्यटकांच्या वाढती संख्या लक्षात घेऊन सैतावडे न्हावणकुंडधबधबा ठिकाणी ग्रामपंचायत व शासनाच्या विविध योजनेतून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे.तसेच या ठिकाणी पीयाळी नदीच्या पात्रात असलेल्या गिरावळ देवीच्या वास्तव्यामुळे या ठिकाणाला एक अध्यात्मक महत्त्वप्राप्तझालेआहे.पर्यटकांनी येथे असलेल्या पीयाळी नदीच्या पात्रातील गीरावळ देवीच्या या स्थानाचे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून पावित्र्य राखून या स्थानातील गीरावळ देवीचे पावित्र्य राखत स्वच्छता राखत आनंद लुटावा व सहकार्य करावे असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य सदानंद उर्फ नंदू देसाई यांच्या कडून करण्यात आले आहे.या ठिकाणी जिल्हासह राज्य वपरराज्यातील पर्यटक गर्दी करणार असून बारमाही वर्षा पर्यटनांसाठी सैतावडे न्हावणकुंडधबधबा यापुढेही शनिवार, रविवार व विकेंडला तसेच वर्षा पर्यटना साठी देखील पर्यटकांची पाऊले वळू लागणार आहेत.यामुळे हिरवीगर्द झाडी, हिरव्या गारनिसर्गरम्य वातावरणातून खळखळ वाहणारा धबधबा पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला अनेक पर्यटक सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मोठी गर्दी करतात.वर्षा पर्यटनासाठी पर्यटक मोठया संख्येने वर्षा पर्यटनासाठी सैतावडे न्हावणकुंड धबधब्याला
पसंती देतात.डोंगर पठारावरुन पसरट कड्यावरुन खाली कोसळणारा गर्द हिरव्या झाडा झुडपांतला आनंदाचं उधाणच आलेला सैतावडे न्हावणकुंड धबधबा असल्याने धबधब्याखाली आंघोळीचा अनेक पर्यटक आनंद लुटतात. यामुळे धबधब्यावर पर्यटकांची संख्या दररोज वाढणार असून रविवार व सुट्टीच्या दिवसांसह अन्य दिवशीही पर्यटक वर्षा पर्यटनासाठी गर्दी करणार आहेत.देवगड तालुक्यातील सैतावडे न्हावणकुंड धबधबा भविष्यातील बारमाही पर्यटनासाठी सज्ज होणार आहे.कसे पोहचाल सैतावडे न्हावणकुंड धबधब्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सैतावडे न्हावणकुंड धबधबा नांदगाव पासून अवघ्या १५ किमी अंतरावर तर देवगड - निपाणी महामार्गापासून शिरगाव फाट्यावरून ३ किमी अंतर आहे.देवगड - निपाणी महामार्गासह नांदगाव मार्गे या धबधब्यावर पर्यटक पोहचू शकतात हा धबधबा अनेकांना आकर्षित करत आहे.










