
देवगड : परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याची जिद्द असेल, तर शारीरिक अपंगत्व कधीही आड येत नाही, हे बापर्डे (ता. देवगड) येथील प्रज्वल विनोद गायकवाड इनामदार यांनी सिद्ध केले आहे.त्यांच्या पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि फोटोग्राफीमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना नुकताच 'भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार - २०२६' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय गौरव सोहळ्यात हा सन्मान देऊन प्रज्वल यांचा गौरव करण्यात आला. १००% कर्णबधिर असूनही प्रज्वल यांनी समाजसेवेचा आणि पत्रकारितेचा जो वसा घेतला आहे,तो कौतुकास्पद आहे.
प्रज्वल गायकवाड यांनी २०१७ मध्ये १० वी आणि २०१९ मध्ये १२ वीचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.त्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली.२०१७ मध्ये त्यांनी स्वतःचे CSC सेंटर आणि YouTube चॅनेल सुरू केले. २०१८ पासून त्यांनी व्यावसायिक फोटोग्राफीमध्ये पाऊल ठेवले आणि आज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक यशस्वी फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात.पत्रकारिता आणि सामाजिक जबाबदारी
केवळ स्वतःच्या व्यवसायापुरते मर्यादित न राहता, प्रज्वल यांनी 'महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे' अध्यक्षपद भूषवत ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. ते 'सारस्थी महाराष्ट्र' आणि 'N For New' या माध्यमांसाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून सक्रिय काम करत आहेत.प्रज्वल यांना यापूर्वी अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे,ज्यात प्रामुख्यानेमहाराष्ट्र गौरव पुरस्कार (२०२४)स्वामी विवेकानंद सोशल रिफॉर्मर पुरस्कार,डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रेरणादायी मानवता पुरस्कार,कोकण सन्मान
अजवाईन छायाचित्र स्पर्धा प्रमाणपत्र (२०१५)बापर्डे सारख्या ग्रामीण भागातून येऊन, शारीरिक आव्हानांना न जुमानता प्रज्वल यांनी मिळवलेले हे यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे वडील विनोद गायकवाड,आई विशाखा गायकवाड,भाऊ प्रणित गायकवाड,आजी वनिता गायकवाड मित्रपरिवार आणि संपूर्ण देवगड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










