'कोकणसाद लाईव्ह' चा स्मार्ट लीडर पुरस्कार देवगड तहसीदार रमेश पवार यांना प्रदान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 16, 2026 17:49 PM
views 44  views

देवगड : देवगड तसीलदार कार्यालयातील सर्वसामान्य जनतेचे तहसीलदार तसेच उत्तम प्रशासक म्हणून ओळख असलेले देवगड तहसीलदार रमेश पवार यांना 'कोकणसाद लाईव्ह' च्या स्मार्ट लीडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देवगड तहसील कार्यालय येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कोकणसाद लाईव्हचे मार्केटिंग हेड समीर सावंत यांच्या हस्ते तहसीलदार रमेश पवार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोकणसाद्द लाईव्हचा 'स्मार्ट लीडर' पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कोकणासाद लाईव्ह कणकवली प्रतिनिधी उमेश बुचडे, सुनील निगडे, मंत्रालय जलसंपदा विभाग कक्ष अधिकारी अवधूत राणे, गगनगिरी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट सल्लागार, मंगेश दळवी, सिव्हिल मिनिस्टर लायसनिंग ऑफिस, देवगड प्रतिनिधी नागेश दुखंडे आदी उपस्थित होते.