
देवगड : शिक्षण विभाग पंचायत समिती देवगड आणि 'दीक्षित फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे (२०२६) उद्घाटन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले. निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सराव परीक्षेचा मुख्य उद्देश तालुक्यातील इयत्ता ४ थी आणि ७ वी मधील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेपूर्वी आत्मविश्वास मिळावा आणि त्यांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव व्हावा हा आहे. या परीक्षेचा लाभ 1000 विद्यार्थ्यांनी घघेतलाप्रमुख उपस्थिती व उद्घाटन:
या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला अविनाश माणगावकर (देवगड), अरुण सोमन (मिठबाव), सुरेश देवळेकर (पडेल)सर्व केंद्रप्रमुख यांच्यासह शिक्षण विभागातील पदाधिकारी, शिक्षक आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
परीक्षेचे स्वरूप व व्याप्ती:
ही परीक्षा देवगड तालुक्यातील खालील ५ केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात आली:
१) देवगड हायस्कूल
२) पडेल हायस्कूल
३) मिठबाव हायस्कूल
४) शिरगाव हायस्कूल
५) फणसगाव हायस्कूल
या परीक्षेमध्ये प्राथमिक (इ. ४ थी) आणि उच्च प्राथमिक (इ. ७ वी) स्तरावर दोन पेपर घेण्यात आले. यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश होता. प्रत्येक पेपर १५० गुणांचा होता.
या उपक्रमाबद्दल बोलताना पडेल मान्यवर श्री सुरेश देवळेकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी 'दीक्षित फाउंडेशन' सातत्याने प्रयत्नशील असते. देवगडचे गटशिक्षणाधिकारी श्री मुकुंद शिनगारे यांनी देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पालकांनी देखील या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले आहे. या सर्वांचे नियोजन गट समन्वयक अशोक जाधव यांनी केले.










