
देवगड : देवगड तालुक्यातील शिवप्रेमी मित्र मंडळ मोंड यांच्यावतीने शिवजयंती निमित्त वृक्ष लागवडीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शालेय जीवनात वृक्ष लागवड व संवर्धनानाची आवड निर्माण व्हावी
यासाठी शिवप्रेमी मित्र मंडळ मोंड यांच्यावतीने शिवजयंती साजरी करताना ५० शालेय विद्यार्थ्यांना विद्या सरवणकर यांच्या हस्ते वृक्ष वाटप केले. मंडळाने विद्यार्थ्यांनसाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये यावर्षी लावलेले वृक्ष पुढील वर्षी प्रत्येकाच्या घरी जाऊन वृक्ष लावल त्याचे संगोपन कसे केले ते पाहून जो त्याचे चांगले संगोपन करेल त्याला १९ फेब्रुवारी२०२७ रोजी म्हणजे पुढील शिवजयंतीस बक्षीस देण्यात येणार आहे. प्रकाश श्रीधर सरवणकर यांनी कै. श्रीधर विठ्ठल सरवणकर यांच्या स्मरणार्थ वृक्ष दिले. या मंडळाच्या सदस्यां कुमारी निकिता ओसरमकर हिच्या या कल्पनेचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.










