दाभोळेत शिवजयंती उत्साहात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 20, 2026 15:23 PM
views 34  views

देवगड : देवगड  दाभोळे येथे शिवजयंती सोहळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आला. या सोहळ्यास गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर ढोल ताशांच्या गजरात मानवंदना देण्यात आली. तसेच महाप्रसाद, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, क्रिकेट सामने, स्थानिक मुलांचे रेकार्ड डान्सचे आयोजन करण्यात आले होते.