
सावंतवाडी : दहावी बोर्ड परीक्षा २०२६ साठी आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमधील परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक शिरीष नाईक तसेच शिक्षक अनिल नाईक,तानाजी वरक, श्रद्धा मुळीक, देवयानी चव्हाण,मिताली नाईक, तानाजी वरक यांनी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक शिरीष नाईक तसेच प्रशालेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य अशा मार्गदर्शक सूचना देत उत्तम यशासाठी आशीर्वाद दिला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, प्रशालेचे विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.










