
देवगड : शिवजयंती उत्सवानिमित्त "मिळून सारे देवगड" आयोजित तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धेमध्ये शेठ म.ग. हायस्कूल, देवगड या शाळेच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. शालेय गटासाठी झालेल्या या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण 11 शाळांचे संघ सहभागी झालेले होते.यामधून देवगड हायस्कूल ने तृतीय क्रमांक प्राप्त केला.यावेळी या समूहाचे अध्यक्ष राजेंद्र हिंदळेकर,नारायण माने, दिलीप कदम, सौ. तनवी चांदोस्कर आदी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या नृत्यासाठी शाळेतील सहाय्यक शिक्षिका श्रीमती आफरीन वसीम पठाण यांनी विशेष मेहनत घेतलेली होती. या यशाबद्दल संस्थापदाधिकारी, मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,पालक वर्ग आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने यशस्वी संघाचे हार्दिक अभिनंदन केलेले आहे.या संघातील सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांचे देखील उत्तम सहकार्य लाभले.










