तेजस्वी महिला ढोल ताशा पथकाचा वर्धापन दिन उत्साहात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 20, 2026 13:33 PM
views 31  views

देवगड :  देवगड तालुक्यातील सिंधु संजीवन संस्था संचलित तेजस्वी महिला ढोल ताशा पथकाचा दुसरा वर्धापन दीन सोहळा मिठबाव येथे मोठ्या जल्लोषात नुकताच पार पडला. यावेळी कुणकेश्वर जिल्हा परिषद सदस्य सुनील बाळकृष्ण पारकर तसेच कुणकेश्वर पंचायत समिती सदस्य अमोल  लोके यांच्या कडून निःशुल्क ढोल-ताशा प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, मिठबांव भंडारवाडी या ठिकाणी या प्रशिक्षण केंद्राची सुरुवात होणार आहे. 

यावेळी कुणकेश्वर जिल्हा परिषद सदस्य सुनील बाळकृष्ण पारकर, कुणकेश्वर पंचायत समिती सदस्य अमोल विजय लोके, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट माजी अध्यक्ष,संतोष हरी लब्दे, संस्था अध्यक्ष चंद्रकांत विश्राम घाडी, ग्रामसेवक पांडुरंग शेटगे, ग्रामसखी मंजिरी मांजरेकर , ग्रामसखी स्मिता जाधव, रामेश्वर हायस्कूल मिठबांवचे मुख्याध्यापक रमेश राऊत सर आदी मान्यवर उपस्थित होते.