सिंधुदुर्गमध्ये रेल थांबा

देवगडच्या गुजराती नवरात्र मंडळाने मानले नितेश राणेंचे आभार
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 27, 2025 11:09 AM
views 140  views

देवगड : देवगड गुजराती नवरात्रौत्सव मंडळ, देवगडच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री, मत्स्यव्यवसाय, बंदरे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची कुणकेश्वर येथे भेट घेतली आणि त्यांचे विशेष आभार मानले. यावेळी दिनेश पटेल, प्रशांत पटेल, लहरिकांत पटेल, भावेश पटेल आणि मनीष पटेल हे उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसल्यामुळे येथील  प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. मागील काही वर्षांपासून जिल्हावासियांकडून या थांब्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. विशेष म्हणजे देवगड मधील गुजराती नवरात्र मंडळाने नामदार नितेश राणे यांची भेट घेऊन हे थांबे मिळावे म्हणून निवेदन देत मागणी केली होती.

खासदार नारायणराव राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे ही मागणी पूर्ण झाली असून, या प्रयत्नांमुळे, एर्नाकुलम - अजमेर मरुसागर एक्सप्रेस (ERNAKULAM - AJMER MARUSAGAR EXPRESS) या गाडीला सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर, तर  हिसार - कोईम्बतूर एक्सप्रेस (HISAR - COIMBATORE EXPRESS) या गाडीला कणकवली रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.