
देवगड : देवगड तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, ठीक ठिकाणी मोठी पडझड झाली आहे. राकसघाटी (निमतवाडी) येथील मंगेश आत्माराम माने यांचे अतिवृष्टीत झाड कोसळून गाडी, घराचे एक लाख रुपये नुकसान झाले आहे. तर अजय सहदेव रानवसे यांचे अतिवृष्टीने दहा हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्याकडून करण्यात आलीय.