
देवगड : नगराध्यक्षांचा कालावधी पाच वर्षे करण्याचा राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय देवगड जामसंडे न.पं मध्ये भाजपाला यामुळे मोठा धक्का देणारा ठरला आहे. राज्यशासनाने मंत्रीमंडळ बैठकीत नगराध्यक्षांचा कालावधी पाच वर्षे केल्याने अडीज वर्षानंतर संख्याबळाच्या आधारावर नगराध्यक्ष बसविण्याचे भाजपाचे स्वप्न अक्षरश: भंग झाले आहे. तर अडीज वर्षाच्या कालावधीनंतर नगराध्यक्षपदावरून उतार झालेल्या विद्यमान नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांचे नशीब मात्र फळफळले आहे.संख्याबळाचा विचार करता नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणणेही भाजपाला अशक्यप्राय असल्याने सत्तेची व नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाèया भाजपाला आता पुढील निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे.
महाविकास आघाडीची न.पं.मध्ये सत्ता आल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या.यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या अनधिकृत बांधकामावरून अपात्रतेची कारवाई, उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत यांनी भाजपाला दिलेला पाठींबा, नगराध्यक्षा साक्षी प्रभू व नगरसेवक रोहन खेडेकर यांनी qशदे गटात केलेला प्रवेश व त्यानंतर उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत यांचा थेट भाजपात प्रवेश करून महाविकास आघाडीला दिलेला मोठा धक्का यामुळे संख्याबळाच्या आधारावर अडीज वर्षानंतर आपलीच सत्ता येणार व आपलाच नगराध्यक्ष बसणार असा ठाम विश्वास भाजपा नगरसेवकांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना, कार्यकत्र्यांना होता त्याचबरोबर जनतेलाही संख्याबळामुळे भाजपाचाच नगराध्यक्ष बसणार असे वाटत होते.
नगराध्यक्षा साक्षी प्रभू या शिंदे गटात गेल्या तरी न.पं.मध्ये भाजपाशी त्यांचे कधी जमले नाही व भाजपानेही त्यांना कायम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.न.पं.हद्दीतील कचराप्रश्न पेटला व भाजपाने नगराध्यक्षांना चांगलेच धारेवर धरले.सभेमध्येही प्रत्येक विषयात भाजपाने नगराध्यक्षांना टार्गेट केले.मात्र यावेळी ठाकरे गटाचे नगरसेवक नगराध्यक्षांची बाजु घेवून लढले.न.पं.मधील अलिकडील सभेत तर भाजपा नगरसेवकांनी थेट नगराध्यक्षांना आव्हान करीत आता तुमचे दिवस संपले आमची सत्ता येणार, आमचा नगराध्यक्ष होणार मग बघू असे उघडउघड बोलून दाखविले.सत्तेची स्वप्ने पाहणारे भाजपा फक्त नगराध्यक्ष आरक्षणाची वाट पाहत होते मात्र आरक्षण प्रक्रिया लांबणीवर गेली यामुळे थोडी धाकधुक होती तरीही निवडणुका झाल्यावर आरक्षण प्रक्रिया पार पडून नगराध्यक्षपदाची निवडणुक होईल असे वाटत होते मात्र राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांचा कालावधी पाव वर्षे केल्याने भाजपाचा नगराध्यक्ष बसण्याचे स्वप्न भंग झाले आहे. तर विद्यमान नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना या निर्णयाने पुन्हा नगराध्यक्ष मिळण्याची शक्यता असल्याने त्यांचे नशीब फळफळले आहे.