
सावंतवाडी : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरात अचानक आलेल्या पावसामुळे गणेशभक्तांचा काहीसा हिरमोड झाला. सकाळपासून सुरू असलेल्या लगबगीत दुपारी १२ च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना सामना करावा लागला.
पावसाचा जोर वाढला असतानाही शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. छत्र्या आणि रेनकोट घेऊन नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. पुजा साहित्य, सजावटीचे सामान आणि इतर आवश्यक वस्तू घेण्यासाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाल्याचं चित्र होतं. पावसामुळे खरेदीला थोडा व्यत्यय आला. मात्र, उत्साहात कोणतीही घट झालेली दिसत नाही.