मंत्री असूनही पंचायत समितीची इमारत केसरकर उभारू शकले नाहीत

रुपेश राऊळ यांची टीका
Edited by: विनायक गांवस
Published on: July 10, 2024 08:41 AM
views 81  views

सावंतवाडी : गेल्या पंधरा वर्षात आमदार व मंत्री होऊन सुद्धा तालुक्यातील पंचायत समितीची इमारत केसरकर उभारू शकले नाहीत. केसरकरांसाठी हेच दुर्दैव आहे अशी टीका उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली. दरम्यान, निवडणुका जवळ आल्याने मंत्री केसरकर यांच्या मोठमोठ्या घोषणा सुरु झाल्या आहेत. परंतु, त्यांच्या घोषणा या केवळ पोकळ आश्वासन आहेत अशी टीका ही श्री.राऊळ यांनी केली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.