उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्गात

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 25, 2025 19:39 PM
views 181  views

सिंधुदुर्गनगरी : उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  

बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगडकडे प्रयाण. 

 सकाळी 10.45 वाजता डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांचे जागेवरील हेलिपॅड, ता. देवगड येथे आगमन व मोटारीने कुणकेश्वर मंदिर ता. देवगडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता कुणकेश्वर मंदिर येथे दर्शन व राखीव. सकाळी 11.30 वाजता मोटारीने श्री. रविंद्र फाटक, माजी आमदार यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता श्री. रविंद्र फाटक, माजी आमदार यांच्या निवासस्थान येथे राखीव. दुपारी 12.15 वाजता मोटारीने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगडकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगड येथे आगमन व हेलिकॉप्टरने मौजे आंगणेवाडी हेलिपॅड, आंगणेवाडी ता. मालवणकडे प्रयाण. दुपारी 12.45 वाजता मौजे आंगणेवाडी हेलिपॅड आंगणेवाडी येथे आगमन व मोटारीने भराडीदेवी मंदिराकडे प्रयाण.  दुपारी 1 वाजता भराडीदेवी मंदिर येथे दर्शन व राखीव. दुपारी 1.30 वाजता मोटारीने मौजे आंगणेवाडी हेलिपॅड, आंगणेवाडी ता. मालवणकडे प्रयाण.  दुपारी 1.45 वाजता मौजे आंगणेवाडी हेलिपॅड आंगणेवाडी ता. मालवण येथे आगमन व हेलिकॉक्टरने चिपी विमानतळ ता. वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व शासकीय विमाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण.