
चिपळूण : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्या रविवार, ता.२७ एप्रिल रोजी , रत्नागिरी जिल्ह्यातील, चिपळूण संगमेश्वर मतदार संघात येत आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी आमदार शेखर निकम यांच्याकडून करण्यात आली आहे. उद्या संपूर्ण दिवस अजितदादा संगमेश्वर, सावर्डे परिसरातील असून त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
सकाळी ९.४० वाजता- हेलिकॉप्टर ने सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे मैदान हेलिपॅड वर आगमन, ९.४५ वाजता- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश आयोजित कोकण महाराष्ट्र- गौरव रथ यात्रा शुभारंभ, १०.३० वाजता- कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि पुरातन मंदिर परिसर पाहणी, ११.३० वाजता- कसबा संगमेश्वर येथे , छत्रपती संभाजी महाराज स्मारकासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा, दुपारी १ वाजता- सह्याद्रि पॉलिटेक्निक, सावर्डे येथे आगमन, दुपारी - १ ते २ - राखीव, दुपारी - २ वाजता- सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे सदिच्छा भेट दुपारी २.३० वाजता- रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते संवाद मेळावा - स्थळ: गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी सेमिनार हॉल. सायंकाळी ४.२५ वाजता- सह्याद्रि शिक्षण संस्था मैदान, सावर्डे हेलिपॅड. सायंकाळी ४.३० वाजता - हेलिकॉप्टर ने मुंबईकडे प्रस्थान.