
सिंधुदुर्गनगरी : निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यात २१०० रुपये तात्काळ जमा करावेत अशी मागणी उबाठा शिवसेना महिला आघाडीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे व २१०० रुपये न मिळाल्यास आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक श्रेया परब, युवती सेना जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे,दीपा शिंदे , मंगल ओरोसकर , पूर्वा ओरोसकर, प्रांजल आढाव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
लाडक्या बहिणांना देण्यात येणाऱ्या १५०० रुपया ऐवजी निवडणुकी नंतर २१०० रुपये दिले जातील असे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते या आश्वासनावर विश्वास ठेवून मतदारांनी मतदान केले व महायुतीची सत्ता आली पंरतू सत्ता आल्यावर २१०० रुपये सोडाचा १५०० रुपये पण लाडक्या बहिणीना मिळालेले नाहीत सत्ता येताच लाडक्या बहिणीचा विसर पडला आहे त्यामुळे महायुती सरकारने तात्काळ २१०० रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करावे अशी मागणी उबाठा महिला शिवसेना आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.