
सावंतवाडी : इन्सुली गावामधून बांदा गावासाठी जाणाऱ्या मुख्य विद्युत प्रवाहाची लाईन दोरीच्या भरवश्यावर आहे. यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चार दिवसांत खांबांची दुरूस्ती करून दोरी न हटवल्यास दोरी कापून टाकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
इन्सुली गावातील विद्युत लोखंडी पोल गंजलेला असून मागच्या पाच महिन्यापासून मुख्य वाहिनीचे खांब दोरीच्या सहायाने बांधून ठेवण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येत्या २० फेब्रुवारी पर्यंत या खांबाची दुरुस्ती न केल्यास आधारासाठी बांधलेली दोरी कापून टाकण्यात येईल व पुढील सर्व घटनेस विद्युत महावितरण कंपनी जबाबदार राहील असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.