ग्राहक पंचायतची देवगड शाखा कार्यकारिणी जाहीर

Edited by:
Published on: February 10, 2025 18:05 PM
views 141  views

देवगड : ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या संस्थेची देवगड तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर झाली असून ग्राहक हा केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” संस्थेची देवगड तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी नारायण माने, संघटकपदी श्याम कदम तर सचिवपदी प्रमोद शेठ यांची एकमताने निवड करण्यात आली.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र देवगड तालुका शाखा स्थापनेसाठी संस्थेच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची सभा संस्थेचे जिल्हाध्यक्ष व राज्य सहसचिव प्रा. एस. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा संघटक श्री.विष्णुप्रसाद दळवी व वैभववाडी तालुका शाखा सल्लागार श्री. शैलेंद्रकुमार परब यांच्या उपस्थितीत जामसंडे- देवगड येथे संपन्न झाली.

जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची स्थापना, रचना, तत्वज्ञान व कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देऊन या अराजकीय विधायक चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. जिल्हा संघटक श्री.विष्णुप्रसाद दळवी यांनी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात होत असलेल्या कार्य व उपक्रमाची माहिती दिली. संस्थेच्या माध्यमातून ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन व ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य केले जाते असे सल्लागार शैलेंद्रकुमार परब यांनी सांगितले. उपस्थितांचे शंका समाधान झाल्यानंतर सर्वांनुमते देवगड तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.तालुका अध्यक्ष- श्री. नारायण रंगराव माने, उपाध्यक्ष- पुजा विलास जाधव, संघटक- श्याम मधुकर कदम, सहसंघटक- रघुनाथ धुळाजी बोडेकर, सहसंघटक महिला- दिपीका दिनकर मेस्त्री, सचिव- प्रमोद अनंत शेठ, सहसचिव- मोहन ज्ञानदेव पाटील, कोषाध्यक्ष- सुनील काशीराम मेस्त्री, सल्लागार- प्रल्हाद शिवराम मालवणकर,प्रसिद्धीप्रमुख- दयानंद यशवंत मांगले, कार्यकारिणी सदस्य शरयू शरद ठुकरूल तसेच दयानंद अर्जुन तेली,गीता गजानन लळीत, स्वप्ना सुनील केळकर व विजय हरी कदम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

देवगड तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र दिल्यानंतर श्री‌.नारायण माने यांनी मनोगतात सांगितले की, आपण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार लोकशाही मार्गाने ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुका शाखेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. देवगड तालुक्यातील ज्या व्यक्तींना या ग्राहक चळवळीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी देवगड तालुका शाखेची संपर्क साधावा असे आवाहनही केले. 

यावेळी माजी अध्यक्ष लक्ष्मण पाताडे यांनी सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन करून आभार प्रदर्शन केले.यावेळी मोहन पाटील, लक्ष्मण पाताडे, प्रल्हाद मालवणकर, गीता लळीत, स्वप्ना केळकर, नारायण माने, पुजा जाधव, श्याम कदम, रघुनाथ बोडेकर, दिपीका मेस्त्री, प्रमोद शेठ, राजेंद्र हिंदळेकर, सुनिल मेस्त्री, दयानंद मांगले, शरयु ठुकरुल, दयानंद तेली व विजय कदम उपस्थित होते.