
वैभववाडी : महाविकास आघाडीच्या विरोधात वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यावर राजकारण करणाऱ्या विरोधकांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाच्या वतीने उबाठाचे नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, राजेंद्र राणे, नेहा माईणकर, प्राची तावडे, संजय सावंत, दिगंबर मांजरेकर, प्रकाश पाटील, विवेक रावराणे, रोहन रावराणे, पुंडलिक पाटील, संगीता चव्हाण, सुंदरी निकम, शिवाजी राणे, अतुल सरवटे, किशोर दळवी, श्रद्धा रावराणे, सुभाष रावराणे, रामदास पावसकर, अनंत नेवरेकर, रमेश शेळके, अनंत फोंडके, श्री बंदरकर, संतोष महाडिक, प्रदीप नारकर, गणेश मोहिते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.