
सावंतवाडी : बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाईड आर्ट), कलामहाविद्यालय सावंतवाडी येथे आय डब्लू एस साऊथ इंडिया यांच्या विद्यमाने २९नोव्हें. २०२४ व. ३०नोव्हे.२०२४ रोजी वॉटर कलर पोर्ट्रेट लाईव्ह डेमोस्टेशन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये कॅनडास्थित मास्टर अतनुर दोगान, कालिदास सातार्डेकर तसेच इन्सुली सावंतवाडी येथील कलाशिक्षक व सुप्रसिध्द वॉटर कलर आर्टीस्ट राजेश आजगांवकर यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत मास्टर अतनुर दोगान व कालिदास सातार्डेकर यांनी वॉटर कलर पोर्ट्रेटचे प्रात्यक्षिक सादर केले. अतनुर दोगान व. राजेश आंजगांवकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यासोबत सावंतवाडी येथील सुप्रसिध्द विठ्ठल मंदिर व माठेवाडा परिसरात वॉटर कलर लॅण्डस्केपचे प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यशाळेत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फुतपणे सहभाग घेतला.
दोन दिवसांची ही कार्यशाळा अतिशय उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना केलेल्या बहुमोल मार्गदर्शन बद्दल निमंत्रित कलाकारांचे महाविद्यालयाचे प्राचार्य उदय वेले यांनी संस्थेतर्फे आभार मानले.