शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिक सादरीकरण कार्यक्रम !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 01, 2024 06:41 AM
views 397  views

सावंतवाडी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, अभिनव फाऊंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेने शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिक सादरीकरणाचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला आहे.

शिवकालीन युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी तसेच नवीन पिढीला या युद्धकलेचे प्रशिक्षण मिळावे या हेतूने अभिनव ने गेले दहा दिवस कळसुलकर इंग्लिश स्कूल येथे या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यात विविध वयोगटातील मुलामुलींनी भाग घेतला व प्रशिक्षण प्राप्त केले. फिरंगोजी शिंदे आखाडा,कोल्हापुर यांनी प्रशिक्षण दिले.

या युद्धकलेच्या प्रात्यक्षिक सादरीकरणाचा जाहीर कार्यक्रम बुधवार दिनांक १ मे २०२४ रोजी जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे सायंकाळी ६.०० वा. आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन अभिनव फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.