कै.राजाराम मराठे कृषि महाविद्यालयामार्फत ग्रामस्थांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक

Edited by: विनायक गावस
Published on: August 09, 2023 19:13 PM
views 155  views

कणकवली : कै.राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट मार्फत ग्रामपंचायत तीवरे येथे बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक देण्यात आले तसेच बुधवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त 2047 पर्यंत भारत देश आत्मनिर्भर व विकसित करू याची शपथ घेण्यात आली व कृषिदूतांमार्फत  बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक  शेतकऱ्यांना दाखवण्यात आले व त्यासोबतच बीज प्रक्रियेचे फायदे आणि महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले. यावेळी तिवरे ग्रामपंचायत सरपंच रवींद्र आंबेलकर, ग्रामसेवक राजेंद्र सावंत, इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि कृषि महाविद्यालयाचे कृषिदुत उपस्थित होते.

कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील प्राचार्य पंकज संते,प्राध्यापक पियूष शिर्के,योगेश जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडाघाट महाविद्यालयाच्या कृषीदूतांन मार्फत सध्या कृषी अनुभव उपक्रम राबवण्यात येत आहे त्यासाठी  14 विविध गावांमध्ये विविध ठिकाणी विद्यार्थी कार्यरत आहेत त्यामध्ये ते शेतकऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीने शेती कशी करावी व शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पन्न कसे वाढावे यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

आज ओंकार चव्हाण, स्वप्निल ढोले, प्रज्योत माने, विशाल शिंदे, हर्षवर्धन पवार, महेश साळुंखे, साई पवन, वेलपल्ला श्रीकांत, शिव किशोर रेड्डी या कृषीदूतांनी तीवरे ग्रामपंचायत येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक पूर्ण केले.