गोठोस गावातील शेतकऱ्यांना भातावरील बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 19, 2023 16:39 PM
views 65  views

कुडाळ : गावात दापोली कृषी महाविद्यालयाच्या रावे कार्यक्रमामध्ये कार्यरत असलेले कृषी तारा या गटाने  भातावरील बीज प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक घेतले. प्रात्यक्षिका वेळी बियाणांची बिज प्रक्रियाचे कृषी मधील अनन्यसाधारण महत्व, त्याचे फायदे आणि फॉसफेट सोलुबिलीझिंग बॅक्टएरिया ची कार्य पद्धती ची माहिती समजावून सांगण्यात आली.या प्रात्यक्षिका मध्ये कृषी तारा गटाचे विद्यार्थी विशाल जगताप,आदित्य खोकले, आदिनाथ चाहेर, सूरज आगळे, कृष्णा बोडके, विठ्ठल यदलवाड, स्वानंद निरगुडे, अथर्व नवले, केतन झेंडे,प्रतिक शेलार उपस्थित होते.

 गोठोस गावातील शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांणी पेरणी करण्यापूर्वी बियाण्यावर मिठाच्या पाण्याणी बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. ज्वारी, भात आणि बाजरी या पिकाच्या बियाण्यावर मिठाच्या पाण्याची प्रक्रिया (Salt Water Treatment) केली जाते त्यामुळे अरगट, काणी, करपा यारख्या रोगावर नियंत्रण मिळवता येते. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. विठ्ठल नाईक, केंद्रप्रमुख डॉ. संदिप गुरव, कार्यक्रमाधिकारी डॉ. रणजित देव्हारे व डॉ. राजेश यांचे सहकार्य लाभले.