निगुडेत श्री पद्धतीच्या भात लावणीचे प्रात्यक्षिक...!

Edited by:
Published on: July 18, 2023 12:45 PM
views 240  views

सावंतवाडी : निगुडे गावातील बरेच शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक शेतीकडे वळले आहेत. निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या शेतात श्री पध्दतीने लावणीचे प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक श्रीमती बेळगुंदकर यांनी दाखवले.

शेतकरी बाळा निगुडकर, चंद्रकांत निगुडकर, सरपंच लक्ष्मण निगुडकर तसेच तसेच बबिता निगुडकर सुवर्णा जाधव, कल्याणी जाधव, राजश्री जाधव इ लोकांना श्री पध्दतीने लावणी केल्याने भाताच्या दोन आल्या मधील प्रमाणात अंतर ठेवल्याने कोळपणी करणे सोयीचे होते, तसेच त्यामध्ये हवा खेळती राहते व भाताचा आव्याला जास्त प्रमाणात फुटवे येतात.

त्यामुळे उत्पादनात विक्रमी वाढ होते. भात कापणी करताना ग्रास कटरचा वापर सुलभरित्या करता येतो. त्यामुळे कापणीला जास्त वेळ लागत नाही. असं बेळगुंदकर यांनी सांगितले. निगुडे गावातील बरेच शेतकरी हे प्रगतशील शेतकरी आहेत ते भाताच्या चांगल्या जातीच्या बियाण्याची निवड करतात व पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक शेतीकडे वळले आहेत असही त्यांनी सांगीतले.