
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील अनाधिकृत दुकान गाळ्यांचे बांधकाम हटवण्याचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तेथे भेट देत हायवे प्राधिकरण ची स्टॉल हटाव मोहीम रद्द करण्याची मागणी केली. गेली 30 ते 35 वर्षे तेथील नागरिक तिथे आपला व्यवसाय करत आहेत. हायवे प्राधिकरणाने आधी त्या स्टॉल धारकांना न्याय द्यावा मगच त्यांनी हटाव मोहीम राबवावी. अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी हायवे प्राधिकरणचे उप अभियंता अतुल शिवनीवर व श्री.कुमावत यांच्याकडे केली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्टॉल धारकांच्या बाजूने ठाम भुमिका मांडत आधी महामार्ग प्राधिकरणाने हद्द निश्चित करावी तो पर्यंत हटाव मोहीम रद्द करावी. अशी मागणी स्टॉल धारकांनी मांडली. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी प्रशासनावर टीका करत, प्रसासनाने विकासकामांवर देखील लक्ष देऊन विकास कामे अश्या वेगाने करा असा सवाल देखील यावेळी विचारला. स्टॉल धारकांच्या मागणी नुसार हायवे प्रसासनाने पुढील 4 दिवसासाठी कामास स्थगिती देण्यात आली आहे.
या काळात भूमी अभिलेख विभागा मार्फत हद्द निश्चित करून मगच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवणीवार व श्री. कुमावत यांनी सांगितले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नागेश मोरये, राजा नावळेकर, मज्जीद बटवाले, राजा म्हसकर कणकवली पोलीस उपनिरीक्षक मारुती जगताप, स्टॉल धारक व ग्रामस्थ उपस्थित होते.