
दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी घटमार्गे कोल्हापूर एसटी बस सेवा तात्काळ सुरु करावी या मागणीसाठी आज सरपंच सेवा संघटनेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी कोल्हापूर येथील एसटी वाहतूक निरीक्षक अनिल मोरे यांच्याकडे नीवेदनाद्वारे मागणी केली आहे. तिलारी रामघाट हा ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत अवजड वाहतुकीसह एसटी बस ब वाहतुकीसाठी बंद करण्यात करण्यात आला होता. एसटी वाहतूक बंद केल्या मुळे प्रवासी व शाळकरी मुलांचे मोठे हाल होऊ लागले होते. यावेळी सरपंच सेवा संघ सिंधुदुर्ग यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी याच्याकडे वारंवार मागणी करून देखील तिलारी घाटातून एसटी बस सेवा सुरु केली नाही. 31 ऑक्टोबर उलटून आज एक महिना पूर्ण झाला तरी देखील तिलारी घाटातून एसटी बस सुरु केली नाही. या घाटातून तात्काळ एसटी सुरु करावी या मागणी साठी आज सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस व दत्ताराम देसाई यांनी आज कोल्हापूर एसटी वाहतूक निरीक्षक अनिल मोरे यांची भेट घेत त्यांना एसटी सुरु करण्या संदर्भात लेखी पत्र दिले. व यावेळी चर्चा ही करण्यात आली. त्यामुळे लवकरच तिलारी घाट मार्गे एसटी वाहतूक सुरु होईल असे प्रवीण गवस यांनी सांगितले.