
देवगड : देवगड बस स्थानकातून सुटणारी देवगड - कणकवली या बस ची सायंकाळी ६.०० वाजताची प्रवासी फेरी आणि परतीची कणकवली देवगड ७.४५ वाजताची प्रवासी फेरी सुरू परत पहल्या सारखी सुरु करण्यात यावी अशी मागणी देवगड तालुका नवनिर्माण सेनेच्या वतीने देवगड आगार व्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आली आहे.
कणकवली येथुन सायं. ६ १५ वाजता देवगड येथे येणारी पणजी देवगड ही प्रवासी फेरी आल्यानंतर कणकवली हुन देवगड कडे येणारी अन्य प्रवासी फेरी नाही .त्यामुळे प्रवाशांची विशेषतः रेल्वे प्रवाशांसाठी कोणतीही प्रवासी फेरी उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवाशांचे गैरसोय होते व नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे साय.६ वाजता सुटणारी देवगड कणकवली ही प्रवासी फेरी पूर्ववत करण्यात यावी व ती परतीच्या प्रवासाकरिता कणकवली येथून सायंकाळी ७.४५ देवगडकडे मार्गस्थ करावी तसेच वस्तीचे सायंकाळी ७. वाजता सुटणारी प्रवासी फेरी देखील पूर्ववत करण्यात यावी. व प्रवासी वर्गाची सोय करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी मनसे माजी तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, माजी सचिव जगदीश जाधव,,माजी शहराध्यक्ष सचिन राणे, विभाग अध्यक्ष परेश आडकर, महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक अमित जाधव माजी विभाग अध्यक्ष नंदकिशोर हडकर व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.