नगरपरिषदेचे पर्यटक स्वागत केंद्र पुन्हा सुरु करण्याची मागणी

Edited by:
Published on: April 14, 2025 19:40 PM
views 111  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउद्यानालगत असलेले नगरपरिषदेचे पर्यटक स्वागत केंद्र  मागील आठ महिन्यांपासून बंद आहे. यामुळे नगरपरिषदेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच शहरात येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. याची गंभीर दखल घेत माजी नगरसेवक राजू बेग यांनी तातडीने या केंद्राची नव्याने निविदा काढून ते पुन्हा सुरू करण्याची मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे केली आहे.केंद्र बंद असल्याने पर्यटकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, आणि शहराच्या प्रतिमेवरही नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर केंद्र पुन्हा सुरू करावे असे त्यांनी म्हटले आहे