हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्याची मागणी....!

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 06, 2024 06:47 AM
views 281  views

कणकवली : जानवली नदीपात्र कडाक्याच्या उन्हामुळे पुरते सुकून गेले असून गेले काही दिवस नदीपत्रालगतच्या नळ योजना देखील पूर्णता बंद झाल्या आहेत. नदीपात्रा लागत असलेल्या नळ योजनेच्या विहिरीना पाणी नसल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात या नदीपत्रालगच्या गावांमधील लोकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्याची मागणी साकेडी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर यांनी तहसीलदार व संबंधित विभागाकडे केली आहे. नागवे, साकेडी, जानवली गावच्या नळ योजना या नदीपात्रालगत असलेल्या विहिरींच्या पाण्यावरअवलंबून आहेत.

मात्र, उन्हाळ्यामुळे यावेळी नदीपात्र व विहिरी कोरड्या पाडल्या असून या विहिरींमध्ये पाण्याची पातळी वाढण्याकरिता हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्याची गरज आहे. दरवर्षी सातत्याने ही मागणी करण्यात येते. मात्र यावर्षी नियमित वेळेपेक्षाही अगोदरच नदीपात्र कोरडे पडल्याने पाणीटंचाईचा सामना येथील ग्रामस्थांना करावा लागत आहे. कुर्ली घोणसरी धरणाच्या कालव्याचे काम व करंजे साठवण तलावाचे देखील काम जलद गतीने मार्गी लागावे अशी देखील मागणी श्री. वालावलकर यांनी केली आहे.