पूर परिस्थितीत आपतकालीन यंत्रणा कार्यरत ठेवण्याची मागणी...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 22, 2023 12:56 PM
views 79  views

सावंतवाडी : बांदा शहरात पावसाळ्यात तेरेखोल नदीला पूर येवून बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने व्यापा-याचे व नागरीकांचे नुकसान होत असते. अशा परीस्थितीतीवर मात करण्यासाठी शासनाची आपतकालीन यंत्रणा कार्यरत ठेवून वेळीच उपलब्ध करावी व बांदा शहरात बांदा ग्रामपंचायतच्यावतीने आपातकालीन समीती प्रशासनाने स्थापन करावी असे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडीच्या तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर, महिला जिल्हाध्यक्षा दर्शना केसरकर, उपाध्यक्ष मिलींद धुरी, सचिव विष्णु चव्हाण, संचालक आनंद कांडरकर उपस्थित होते. बांदा शहरात पुर आल्यावर वेगवेगळ्या मंडळाचे तरूण कार्यकर्ते आपत्ती व्यवस्थापनाचे व मदतीचे कार्य करत असतात. त्या विवीधमंडळान कडे असलेले साहीत्य तोकडे आहे त्यासाठी शासनाने साहीत्य उपलब्ध करावे. त्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षीत करावे. बांदा पोलीस स्टेशनकडे असलेली बोट व इतर साहीत्य यासाठी प्रशीक्षीत कर्मचारी मुन, महसुल यंत्रणेमार्फत याची चाचणी घ्यावी व आपत्ती व्यवस्थापन समीतीही स्थापन करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे सचीव विष्णु चव्हाण यानी केली.