तलाठी परीक्षा केंद्र सिंधुदुर्गात मिळण्याची मागणी

Edited by: भरत केसरकर
Published on: August 14, 2023 17:17 PM
views 224  views

कुडाळ : खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी तलाठी केंद्र मिळावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली, अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिली. 

तलाठी परीक्षा केंद्र सिंधुदुर्गात मिळावे यासाठी युवासेनेने घेतली खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी भेट घेऊन तलाठी परीक्षा केंद्र सिंधुदुर्ग मध्ये व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत यांनी तातडीने जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी तसेच महसूल सचिव यांच्याशी चर्चा केली . आता होणाऱ्या जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ महसूल अधिकारी त्यांच्या होणाऱ्या व्हिडीओ कॉन्स्फरिंग मध्ये तलाठी केंद्र सिंधुदुर्ग मध्ये व्हावे अशी मागणी  करण्याचे जिल्हाधिकारी यांना  सूचना दिल्या आहेत. यावेळी युवासेनेचे मंदार शिरसाट, सागर नाणोसकर, गुणाजी गावडे, कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.