नवीन कुर्ली वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून देण्याची मागणी..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 28, 2023 18:55 PM
views 182  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत "नवीन कुर्ली वसाहत ” साठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नवीन कुर्ली वसाहत मधील ग्रामस्थांच्या वतीने केली आहे. 

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विधिमंडळ कामकाजा वेळी नवीन कुर्लीग्रामविकास मंडळा (रजि.)चे अध्यक्ष राजेंद्र कोलते आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे,सूरज तावडे,धीरज हुंबे,कृष्णा परब,अमित दळवी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. व नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत गरजेची आहे.आमची सातत्याने विनंती आहे. ती पूर्ण करावी अशी मागणी केली.