जीर्ण वृक्ष तोडण्याची मागणी..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 30, 2023 11:46 AM
views 152  views

सावंतवाडी : पावसाळ्यापूर्वी जीर्ण झालेले वृक्ष तोडण्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका तसेच इतर शासकीय कार्यालयाला देण्यात आले होते. मात्र तरीदेखील दखल न घेतल्याने राजवाडा येथील वृक्ष कोसळून दोन युवकांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा त्यांना जागे करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून येथील शासकीय कार्यालयांना निवेदन देऊन वृक्ष तोडण्याची मागणी यावेळी केली आहे.

दरम्यान, घडलेली घटना ही दुर्दैवी असून ती पुन्हा घडू नये यासाठी आज पुन्हा निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेऊन त्वरित योग्य कारवाई करावी. अन्यथा मोठा जनसमुदाय उभा करून शासनाच्या विरोधात आंदोलन उभ करण्यात येईल असा इशारा देखील सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

यावेळी सामाजिक बांधिलकीचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, संजय पेडणेकर, प्रा. शैलेश नाईक, प्रा सतीश बागवे, समीरा खलील, हेलन निबरे, श्याम हळदणकर, शेखर सुभेदार, अशोक पेडणेकर, शरद पेडणेकर, प्रा. प्रसाद कोदे आदी यावेळी उपस्थित होते.