मच्छी मार्केटसाठीची जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्याची मागणी

Edited by:
Published on: February 03, 2025 19:48 PM
views 104  views

कुडाळ : कुडाळ शहरातील मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीच्या नगरसेवकांनी निवेदन दिले. ही जागा लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांकडून हस्तांतर करण्यात येईल असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

कुडाळ शहरांमध्ये असलेले मच्छी मार्केट हे विकसित करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने पाऊले उचलली असून ही जागा पूर्वी ग्रामपंचायत नावे होती. त्यानंतर ती महाराष्ट्र शासनाच्या नावे झाली आताही जागा कुडाळ नगरपंचायतीच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक ॲड. राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रृती वर्दम यांनी निवेदन सादर केले ही जमीन नगरपंचायतीला हस्तांतरित झाल्यावर मच्छी मार्केट विकसित करता येईल सांगण्यात आले. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांच्या हित चर्चा करून ही जागा लवकरात लवकर नगरपंचायतीला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया करण्यात येईल असे सांगितले.